न्यायालयातून पळून गेलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिसांनी केले जेरबंद
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातून पळून गेलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीसांनी जेरबंद केले आहे. अनमोल अतुल जाधवराव वय -३६ वर्षे रा.सुरजनगर महाराजा काॅम्प्लेक्सजवळ, कोथरूड डेपो समोर असे शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अनमोल अतुल जाधवराव हा वेगवेगळी वेशभूषा करून नाशिक, मुंबई, सातारा, सांगली तसेच पुणे शहरातील पौंड, मुळशी,हवेली असे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वेशभूषा करून वावरत होता.दि.६/१०/२०२५ रोजी पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, शिवाजीनगर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ११०/२०२५ बी.एन.एस कलम २६२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अनमोल अतुल जाधवराव हा अहिल्यानगर कडून वाघोली,पुणे या दिशेने चारचाकी गाडीने येत आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची सोबतच्या स्टाफला सांगून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळविली असता वरिष्ठांनी योग्य त्या सूचना दिल्यानंतर बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने आम्ही मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून सापळा लावण्यात आला.मिळालेल्या माहितीप्रमाणे कावेळी हाॅटेलसमोर खांदवे नगर येथे चारचाकी गाडी नंबर एम एच ०४ इ एक्स ८२४४ ही गाडी आल्याने सदर गाडीस चारही बाजूने सापळा लावून त्यास जागीच पोलीस स्टाफच्या मदतीने साडेचार वाजता ताब्यात घेतले.सदर फोरव्हिलरमध्ये दोन इसम होते.दोघा आरोपींना शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आणले असता आरोपी अनमोल अतुल जाधवराव याने तपासात सांगितले,टि व्ही वरील क्राईम पेट्रोल , सावधान इंडिया,सी आय डी हे सिरीयल पाहून पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी कसे प्रयत्न करतात हे माहिती झाल्याने मी १०० ते १५० किलोमीटर अंतर बदलून रस्त्याने जाणा-या लोकांना माझा मोबाईल फोन हरविलेला आहे . माझ्या घरांशी संपर्क करावयाचा आहे.असे कारण सांगून माझ्या मित्रांशी संपर्क करत होतो.संपर्क झाल्यानंतर ते ठिकाण बदलत होतो असे तपासात सांगितले.आरोपी सोबत वाहनातील दुसरा इसम अक्षय संजय हंपे वय ३० रा.सौरभनगर भिंगार अहिल्या नगर असे सांगितले.सदरचा इसम अहिल्यानगर येथील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहे. शिवाजीनगर पुणे शहर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.