• Total Visitor ( 428831 )
News photo

श्री साईबाबा संस्थानचा विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून गौरव

Raju tapal February 07, 2026 23

श्री साईबाबा संस्थानचा विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून गौरव



शिर्डी : श्री साईबाबा संस्थानचा जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून संस्थानला ॲानर सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले आहे. श्री साईबाबांच्या कृपेने लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे अध्यक्ष व १८४ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय डॉ दीपक हरके यांनी ॲानर सर्टिफिकेट संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से. यांचेकडे  प्रदान केले. यावेळी संस्‍थानचे प्र.उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे,प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले,प्र.प्रशासकिय अधिकारी अतुल वाघ,मुख्‍य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे धार्मिक,सामाजिक व मानवसेवेतील योगदान अधोरेखित झाले आहे. भाविकांच्या सेवेसाठी संस्थान सातत्याने करत असलेल्या कार्याला यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement