• Total Visitor ( 636486 )
News photo

स्नॅबिट (Snabbit) हाऊसकीपिंग कर्मचारी अटकेत;चोरीस गेलेले ५ तोळ्यांचे मंगळसूत्र जप्त

Raju Tapal publisher July 17, 2026 32

स्नॅबिट (Snabbit) हाऊसकीपिंग कर्मचारी अटकेत;चोरीस गेलेले ५ तोळ्यांचे मंगळसूत्र जप्त



ठाणे :- वागळे इस्टेट परिसरातील जय गणराज हाऊसिंग सोसायटी, रामचंद्र नगर क्रमांक १ येथील रहिवासी सदानंद आत्माराम चाळके (वय ६४) यांच्या घरातून सुमारे ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२३/२०२६, कलम ३०५(अ) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदारांनी घरातील साफसफाईच्या कामासाठी Snabbit ॲपद्वारे तीन महिला हाऊसकीपिंग कर्मचारी बोलावल्या होत्या. पोलिसांनी तिघींची स्वतंत्र चौकशी केली असता, त्यापैकी रोशनी किशोर जगताप (वय २२),रा. आदर्श चाळ,रोड क्रमांक २१,साठे नगर,वागळे इस्टेट,ठाणे हिने चोरीची कबुली दिली. त्यानंतर तिला दिनांक ८ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली. तिच्याकडून चोरीस गेलेले संपूर्ण सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून पुढील तपास वागळे इस्टेट पोलीस करीत आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर,वागळे इस्टेट पोलीस ठाणे यांनी दिली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement