वाडेबोल्हाई प्रा.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदी स्नेहल घोडेराव
सरपंच पल्लवी प्रदिप शिंदे,संजयराव भोरडे पा.यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वागतपर सत्कार
फुलगाव (गौतम पाटोळे):- श्री क्षेत्र वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथील मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी(गट अ) पदी डॉ.स्नेहल अशोकराव घोडेराव यांची निवड झाली आहे.तर कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सूर्यवंशी यांची बदली होत रांजणगाव गणपती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदावर त्यांची निवड झाली आहे. वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी(गट अ) पदाचा पदभार डॉ.स्नेहल अशोकराव घोडेराव यांनी स्वीकारल्या निमित्ताने त्यांचा स्वागतपर सत्कार व याआधी या वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राची आदर्श उभारणी करून सर्व सोयी,सुविधायुक्त आरोग्य केंद्राची इमारत उभारली व पूर्व हवेली तालुक्यातील नागरिकांना उत्तम सेवा,सुविधा दिल्याबद्दल या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन सूर्यवंशी यांच्या कार्याचा कौतुकाचा सन्मान वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त महिला सरपंच पल्लवी प्रदिप शिंदे,वाडेबोल्हाईचे माजी उपसरपंच तथा ज्येष्ठ नेते संजयराव भोरडे पाटील यांच्या हस्ते पार पडला. या दोन्ही सत्कार प्रसंगी वाडेबोल्हाईचे युवा नेते तथा प्रसिद्ध उद्योजक प्रदिप शिंदे,ग्रामपंचायत सदस्या सोनाली दादासाहेब शिंदे,माजी उपसरपंच संजयराव पायगुडे,ज्येष्ठ नेते पंडित पायगुडे,माजी उपसरपंच तथा युवा नेते योगेश गायकवाड,सा.कार्यकर्ते संदीप उर्फ पिलू चव्हाण,वाडेबोल्हाई कार्यक्षम वायरमन अमोल पायगुडे,पत्रकार सुखदेव भोरडे,पत्रकार संघाचे पच्छिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पत्रकार विजयराव लोखंडे,डॉ.लोहार सर,भोसले,आदी मान्यवर,आरोग्य सेविका,ग्रामस्थ उपस्थित होते. यापुढे आमच्या वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तम काम करण्याच्या शुभेच्छा उपस्थित मान्यवर,ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल घोडेराव यांना यावेळी दिल्या.
डॉ.स्नेहल घोडेराव अनुभवी कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी -
वाडेबोल्हाई(ता.हवेली) येथील मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी(गट अ) पदी नवनियुक्त झालेल्या डॉ.स्नेहल अशोकराव घोडेराव या अनुभवी कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.त्यांनी याधी आपल्या कामाच्या सेवेत रांजणगाव गणपती प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी (गट अ) १० वर्ष सेवा केली आहे.त्या आता वाडेबोल्हाई रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,मी थोडी माझ्या घराजवळ आली असून या वाडेबोल्हाई आरोग्य केंद्राची रुग्णांना सुसज्ज सेवा,सुविधा देणारी मोठी सुंदर इमारत असून संपूर्ण सेवा,सुविधा या आरोग्य केंद्रात आहेत.जेव्हढे जास्त पद्धतीने काम करता येईल तेव्हढे मी यापुढे करणार असून या भागातील रुग्णांना यापुढे उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करू.मी रुजू झाल्यानंतर माझं गावच्या सरपंच पल्लवी(ताई) प्रदिप शिंदे व आदी मान्यवरांनी जो स्वागतपर सत्कार केला त्याला मी बांधील राहून चांगले काम करेल.व जिल्ह्यात आपले वाडेबोल्हाईचे प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल घोडेराव यांनी सांगितले.
छायाचित्र ओळ:-वाडेबोल्हाई प्रा.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदी रुजू झालेल्या डॉ.स्नेहल घोडेराव यांचा स्वागतपर सत्कार करताना सरपंच पल्लवी प्रदिप शिंदे,ज्येष्ठ नेते संजयराव भोरडे,सह मान्यवर.