भरधाव वेगातील दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक; एकजण मृत्युमुखी
शिरूर - रामलिंग रस्त्यावरील घटना
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- भरधाव वेगातील दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण मृत्युमुखी पडल्याची घटना शिरूर -रामलिंग रस्त्यावर घडली.
एम एच १२ एच एम ६९७१ या क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटरसायकल वरून जाणारा दुचाकी चालक प्रशांत परमेश्वर जाधव रा.रामलिंग मूळ रा.भडगाव जि.जळगाव याने भरधाव वेगात वाहन चालवून समोरून येणाऱ्या नितीन दौलत जाधव वय ३५ रा.रामलिंग यांच्या एम एच १२डी यू ६५२६ पल्सर मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असे समजते.
नितीन जाधव यांच्या हातापायासह पोटावर गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हवालदार उमेश भगत या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.