खंडाळे येथील शेतक-याच्या शेतातून स्प्रिंकलर साहित्य चोरीस
शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील खंडाळे येथील शेतकरी विलास खेडकर यांच्या शेतातून स्प्रिंकलर साहित्य चोरीस जाण्यासाठी घटना नुकतीच घडली. चार - पाच शेतक-यांचे मिळून जवळपास ५ ते ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी विलास खेडकर यांनी पत्रकारांना सांगितले. खंडाळे येथील शेतकरी विलास खेडकर यांनी पत्रकारांना चोरीच्या घटनेबाबत असे सांगितले,माझ्या शेतात कांदा होता.२ एकर कांद्याला दोन,तीन,पाच,सात रूपये असा बाजारभाव भेटल्याने कांद्याचे पैसे झाले नाहीत.त्यामुळे कांदा रोटरून त्या जागी धना,मेथी पीक केले. धना मेथी साठी दीड लाख रूपयांचे स्प्रिंकलर साहित्य शिक्रापूर येथून आणले.
ते साहित्य जोडल्यानंतर पाणी चालू केले.त्यानंतर आम्ही घरी गेलो.सकाळी येवून पाहिल्यानंतर पाईप बंडल, स्प्रिंकलर पाईप,गज,पूर्ण स्प्रिंकलर चोरीस गेला. असे माझे दीड ते दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. एफ आय आर नोंद केली आहे. सोबतच गावातील चार पाच जणांचे साहित्य चोरीस गेले असून टोटल ५ ते ६ लाख रूपयांचे मटेरियल चोरीस गेले आहे. असे झाले तर शेतक-याने काय करायचे? असा सवाल खंडाळे येथील शेतकरी विलासराव खेडकर यांनी केला असून पोलिसांनी ताबडतोब न्याय द्यावा अशी मागणी खंडाळे येथील शेतकरी विलासराव खेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.