• Total Visitor ( 429939 )
News photo

श्रीनाथ म्हस्कोबा, देवी जोगेश्वरी उत्सवमूर्तींना श्रीक्षेत्र वीर येथे दही भात

Raju tapal July 26, 2025 72

श्रीनाथ म्हस्कोबा, देवी जोगेश्वरी उत्सवमूर्तींना श्रीक्षेत्र वीर येथे दही भात



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- आषाढ अमावस्येनिमित्त श्री.क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा,देवी जोगेश्वरी उत्सवमूर्तींना भाविकांच्या वतीने दही भात पूजा बांधण्यात आली.

अमावस्येनिमित्त पुरंदर तालुक्यातील श्री.क्षेत्र वीर येथील श्री.नाथ म्हस्कोबा,देवी जोगेश्वरीची पहाटे साडेचार वाजता पुजा झाल्यानंतर मुख्य गाभारा बंद करण्यात आला.सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.देवस्थान ट्रस्ट, भाविकांच्या वतीने देवाला अभिषेक करण्यासाठी सकाळपासूनच सुरूवात करण्यात आली. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या वतीने दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या.

दुपारी १२ वाजता देवाची धुपारती होवून मुख्य गाभारा बंद करण्यात आला.त्यानंतर सव्वा एक वाजता गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. देऊळवाड्यातील दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर पार पडला.

विठ्ठलराव धुमाळ,राम धुमाळ, सुशीलकुमार जाधव यांच्यावतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी पत्रकारांना सांगितले.

ट्रस्टचे उपाध्यक्ष, सचिव काशिनाथराव धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ,विश्वस्त सुनील धुमाळ,विराज धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासाहेब समगीर‌, जयवंत सोनवणे, प्रमिला देशमुख,अलका जाधव यांनी धार्मिक कार्यक्रम यशस्वीततेसाठी परिश्रम घेतले.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement