• Total Visitor ( 445709 )
News photo

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची भरारी 

Raju Tapal publisher March 22, 2026 13

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची भरारी 



अमरावती :- जवाहर नवोदय विद्यालय करिता सन 2026- 27 या शैक्षणिक वर्षांकरिता इयत्ता सहावी मध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये यावर्षी जिल्हा परिषदेच्या तब्बल 35 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. मागील वर्षी जिल्हा परिषदेचे 18 विद्यार्थी निवडीस पात्र ठरले होते. त्या तुलनेत यावर्षी जवळजवळ दुप्पट म्हणजे एकूण 35 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे  अभिनंदन केले आहे.विशेष म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षेमधील विद्यार्थ्यांच्या यशाचा टक्का वाढवा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी विशेष उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविले.यामध्ये जिल्हा स्तरावरून विद्यार्थ्यांकरीता सराव चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते तसेच नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शीकांची छपाई करून शाळांना वितरित करण्यात आल्या.शाळास्तरावर अतिरिक्त मार्गदर्शनाकरिता सर्व शिक्षकांना प्रोत्साहित करण्यात आले होते.जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री सतीश मुगल यांनी सुद्धा विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले असून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांंबद्दल त्यांचे शिक्षण विभागाच्या वतीने आभार व्यक्त केले आहे. जवाहर नवोदय विद्यालया करीता निवड झालेल्या मध्ये योगिनी पंकज धरपवार,अचलपूर,तेजश्री नरेंद्र बुलहारे,अमरावती, नयना नितीन खांडेकर,अमरावती,स्वरा संजय तायडे,अमरावती,प्रम राहूल गवई,अंजनगाव सुर्जी,श्रीजित सोपान शेन्द्रे

भातकुली,अवेंश मंगेश मेश्राम,भातकुली,समृद्धी सतीश वासनिक,चांदूर रेल्वे,सतेज तेजस्वी KARUNADHAN चांदूर रेल्वे,अंकुश कैलास येवले,चिखलदरा, सोनल संतोष बेलकर,चिखलदरा,सुभाष सुनील धांडे,चिखलदरा,अपर्णा संजू मावस्कर चिखलदरा,आरुषी इंद्रपाल नागदिवे,चिखलदरा,समीक्षा सुरेश आठोले चिखलदरा, देवांश कैलाश बेलकर,चिखलदरा,विशाखा साबुलाल बेलसरे चिखलदरा, तुषार टिकाराम जामुनकर,चिखलदरा,तनवेश अरविंद वानखाडे दर्यापूर,ईशासानी जितेंद्र रायबोले,दर्यापूर,प्राची सचिन बाहेकर दर्यापूर, जितेश प्रमोद लोंकर,दर्यापूर,कांचन प्रमोद दखने,धामणगाव रेल्वे रूपसा राधेशम भिलावेकर धारणी,संस्कृती प्रशांत टेकाडे,मोर्शी,प्रज्वाल विष्णू अकोटकर,मोर्शी,ईश्वरी अनिल गुलक्षे,मोर्शी,हृषिकेश सुनीलराव बी गुलामक्षे ,मोर्शी,वैभवी दिनेश कांठाले,नांदगाव खंडे,माही श्रीकृष्णा गोडबोले,नांदगाव ख.मयुरी नितीन गिरटकर,नांदगाव खंडे.भक्ती सुनीलराव चौधरी नांदगाव ख.ईश्वरी रुपेश निंगोट,नांदगाव खं. स्वरा अमोल हादे,जीविका मंगेश कोडापे,वरूड या विद्यार्थांचा सहभाग आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement