• Total Visitor ( 430535 )
News photo

मंचर - घोडेगाव रस्त्यावरील अपघातात शिक्षकाचा मृत्यू 

Raju tapal August 05, 2025 88

मंचर - घोडेगाव रस्त्यावरील अपघातात शिक्षकाचा मृत्यू 



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- मंचर -घोडेगाव रस्त्यावरील चिंचपुरेमळा येथे झालेल्या अपघातात लांडेवाडी येथील ३२ वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.४ आॅगस्टला दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

अजय मनोहर आढळराव पाटील असे अपघातातील मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव असून प्रतिक संतोष कोकरे (वय -२२ रा‌.निरगुडसर‌ ता‌.आंबेगाव) असे अपघातातील  गंभीर जखमीचे नाव आहे‌.

या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार,अजय आढळराव पाटील हे त्यांच्या शिक्षक पत्नी प्रतिमा  व कन्या मायरा‌ ( वय -अडीच वर्षे) यांना मंचर येथील मुळेवाडी रस्त्यावर न्यू‌ आॅक्सफर्ड स्कूलमध्ये सोडून एम एच -१२ के सी ८७३९ या मोटरसायकलवरून लांडेवाडी कडे परतत होते. त्याचवेळी प्रतिक कोकरे यांची मोटरसायकल क्र.एम एच १४ एल सी १४२५ त्यांच्या शेजारी आल्याने दोन्ही मोटरसायकलचे हॅण्डल एकमेकांना अडकले. त्यामुळे दोघा़ंच्याही मोटरसायकलचा तोल जावून हेलकावल्या.

अशा अवस्थेत घोडेगाव वरून मंचरच्या दिशेने जात असलेल्या एम एच ४८ बी टी १६७८ या क्रमांकाच्या इको कारची जोरदार धडक बसली. या धडकेत अजय आढळराव पाटील 

यांच्या मोटरसायकलचा चक्काचूर झाला.वाहनाचे मागील चाकही निखळले.मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना तातडीने नेण्यात आले. डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात प्रतिक कोकरे हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर म़ंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत असे समजले.पोलीस हवालदार विनोद जांभळे हे या अपघाताचा तपास करत आहेत.

     


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement