शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा अमरावती
जिल्हातील शाळा बंद ठेवुन शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंञी देवेन्द्रजी फडणवीस व शालेय शिक्षणमंञी दादाजी भुसे यांना निवेदन आंदोलनात जिल्हातील प्राथमिक,माध्यमिक,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी शिक्षकांच्या TET सक्ती व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर सामूहिक रजा घेऊन शाळाबंद आंदोलन अमरावती-शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती ने दिले नोटीस नुसार मागण्यांची शासनाकडून सोडवणूक होत नसल्याने आज ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनाचा भाग शाळा बंद करून कोणालाही वेठीस धरण्याचा नव्हता किंवा नाही; तर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संबंधात शासनाने अनुकूल निर्णय घ्यावा हाच एकमेव उद्देश आहे.अशी माहीती सहभागी शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी सांगीतले आहे. या आंदोलना मध्ये प्राथमिक शिक्षकांना TET अनिवार्य करण्यासंबंधाने राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणार्थ भूमिका घेऊन न्याय द्यावा. RTE Act कलम - २३ मध्ये TET बाबत सुधारणा करण्यासह NCTE च्या अधिसूचनेत दुरुस्ती होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक पावले तातडीने उचलण्यात यावीत. TET अनिवार्यतेच्या नावाखाली थांबविलेल्या पदोन्नती प्रक्रिया शीघ्र सुरु व्हावी. म. ना. से. नियम १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत बहाल करावी. संचमान्यता शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद (समायोजित) करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची हेळसांड थांबवावी. शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक भरती पूर्वलक्षी प्रभावाने सुरु करावी.सर्व विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरु करावी. दैनंदिन अध्यापन कार्य प्रभावित करणारी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनास अडसर ठरणारी BLO सह ऑनलाईन / ऑफलाईन कामे बंद करावी. पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवा प्रथम नियुक्तीपासून पेन्शनसह सर्व प्रयोजनासाठी ग्राह्य धराव्यात. ग्रामीण भागात सेवारत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी मुख्यालयी शासनाने निवासस्थाने बांधून द्यावीत. तोपर्यंत मुख्यालयी राहण्यासंबंधाने शिस्तभंगाची नावाखाली सक्ती करू नये. नगर पालिका,महानगर पालिका प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक गठीत करून वेतन व सर्व थकबाकीचा प्रश्न सोडवावा. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करावे. पेसा क्षेत्रात प्राथमिक शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत कार्यरत कंत्राटी शिक्षकांच्या सेवा कायम ठेवाव्यात. शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या व शाळांतील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालय स्तरावर संघटनांच्या किमान त्रैमासिक नियमित बैठक आयोजित कराव्यात. आंतरजिल्हा बदलीचा पुढील टप्पा तात्काळ सुरू करण्यात यावा तसेच बदलीसाठीच्या अनिवार्य सेवा कालावधीची अट शिथिल करावी या प्रश्नांच्या संबंधाने शासनाची भूमिका अधिक सकारात्मक असण्याची गरज आहे. परंतु शासन स्तरावर अनुकूल असा प्रतिसाद दिसून येत नाही. वारंवार संघटनांच्या माध्यमातून पत्र व्यवहार करून,भेटी घेऊनही दुर्लक्ष कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था,शासकीय,अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाही. शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असतानाही त्याबाबत अनुकूल असे निर्णय होत नाही. शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य अंधःकारात ढकलल्या जाणाऱ्या TET सारख्या प्रश्नावर शिक्षकांना न्याय देण्याच्या बाबतीत कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना आहेत.त्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती ने आज शुक्रवारी दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील व जिल्हातील सर्व प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्था चालक संघटनांच्या उत्स्फूर्त सहभागाने राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आंदोलन केले आहे.शासनाने सद्यस्थितीचा व या आंदोलनास मिळालेला प्रतिसाद बघता न्यायसंगत मागण्यांच्या सोडवणुकीसाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.अशा इशारा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार,शैलेन्द्र दहातोंडे,जिल्हा सरचिटणीस,राजेश सावरकर,राज्य प्रसिध्दी प्रमुख,जिल्हा नेते गोकुलदास राऊत,संभाजी रेवाळे,प्रविणा कोल्हे,राज्य' महीला प्रतिनिधी,प्रशांत निमकर,जिल्हा कार्याध्यक्ष,नंदकीशोर पाटील,जिल्हा कोषाध्यक्ष,मनिष काळे,कार्यालयीन सचिव महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे,विनिता घुलक्षे,जिल्हा सरचिटणीस,सुषमा वानखडे,जिल्हा कार्याध्यक्ष,भावना ठाकरे,जिल्हा कोषाध्यक्ष,जुनी पेन्शन सेलचे जिल्हा प्रमुख अल्हाद तराळ,जिल्हा प्रमुख,प्रेमसुख ठोंबरे,जिल्हा सरचिटणीस,निलेश कांडलकर,जिल्हा कार्याध्यक्ष,पंकज दहीकर,जिल्हा कोषाध्यक्ष
म.रा.जुनी पेन्शन संघटनाचे गौरव काळे,म.रा.प्राथमिक शिक्षक संघ(संभाजी थोरात गट)अजय साव,भगत सर,म.रा.उर्दू शिक्षक संघटनाचे जावेद जोहर,शहजाद अहमद,शे.मुजोबोद्दीन,अ.भा.उर्दू शिक्षक संघटनेचे वसीम फरहत,मो.इस्हाक,सै.अहमद अली,शिक्षक सेनेचे रुपेश टाले,राजाभाऊ राजनकर,अनिल कोल्हे,निलेश टोपे,उमाकांत जिरापूरे,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलिप कडू,चेतवा संघटनेचे संतेन्दु अभ्यंकर,शिक्षक परिषदचे पदाधिकारी शिक्षक यांच्यासह दिनेश साबळे,संगीता तडस उमेश चुनकीकर,सदानंद रेवाळे सह शेकडो शिक्षक,शिक्षिका उपस्थित होते.असे शिक्षक समितीचे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.