• Total Visitor ( 701046 )
News photo

शिक्षक संपूर्ण पिढी घडवण्याचे कार्य करतात

Raju Tapal publisher September 07, 2026 23

शिक्षक संपूर्ण पिढी घडवण्याचे कार्य करतात



डॉ.रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद

   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे



ठाणे:-शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,असे प्रतिपादन ठाणे येथील 'सत्कार रेसिडेन्सी' येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करण्यात आले. डॉ.रेवती श्रीनिवासन लिखित "Creating Classrooms Where Every Child Belongs" या पुस्तकाचा सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी खासदार नरेश म्हस्के,माजी खासदार आनंद परांजपे,उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर,शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की,शिक्षण क्षेत्रातील डॉ.रेवती श्रीनिवासन यांच्या योगदानाचे कौतुक केले. "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येकाला समान संधी मिळण्यासाठी वर्गातील वातावरण सर्वसमावेशक असणे गरजेचे आहे. हे पुस्तक शिक्षक,पालक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल,"असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ.रेवती श्रीनिवासन यांच्या कार्याचा गौरव गेल्या तीन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत योगदान देणाऱ्या डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी सर्वसामान्य मुलांसोबतच विशेष गरजा असणाऱ्या (Special Needs),ग्रामीण व वंचित घटकांतील मुलांसाठी थेरपी सेंटर्स आणि विशेष उपक्रम राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. लंडनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये झालेला त्यांचा सन्मान आणि त्यांनी निर्माण केलेला शैक्षणिक वारसा संपूर्ण ठाणेकरांसाठी अभिमानास्पद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमादरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत,शाळेतील प्रवेश प्रक्रियेसाठी सामान्य कार्यकर्त्यांच्या व पालकांच्या विनंत्या घेऊन प्रत्यक्ष शाळेत येण्याच्या जुन्या प्रसंगांचे स्मरणही यावेळी करण्यात आले. यावेळी डॉ. रेवती श्रीनिवासन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की,शिक्षणाचा खरा उद्देश केवळ साक्षरता नसून,प्रत्येक बालकाच्या क्षमतेचा शोध घेऊन त्याला समाजात आत्मसन्मानाने जगण्याचे बळ देणे हा आहे. ​सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच विशेष गरजा असणारी मुले (Special Needs Children),ग्रामीण आणि सामाजिक - आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुले यांच्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक आहे. विशेष थेरपी सेंटर्स आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून  या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली पाहिजे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026