• Total Visitor ( 430598 )
News photo

दुधाच्या टेम्पोची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला पाठीमागून धडक; तिघांचा मृत्यू 

Raju tapal August 18, 2025 75

दुधाच्या टेम्पोची मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला पाठीमागून धडक; तिघांचा मृत्यू 



शिक्रापूर (प्रतिनिधी):- 

दुधाच्या टेम्पोने मालवाहतूक करणा-या टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई येथील बंटी ढाब्यासमोर रविवारी दि.१७ आॅगस्टला पहाटे घडली.

शांताबाई मकाजी वाजे वय -६८ वर्षे, ज्ञानेश्वर मकाजी वाजे वय -३८ वर्षं,युवांश ज्ञानेश्वर वाजे वय - ५ वर्षे (रा‌.तिघेही वडनेर ) अशी एकाच कुटुंबातील तिघा मृतांची नावे आहेत.

या अपघाता बाबत समजलेल्या माहितीनूसार, मुंबईहून निघोजकडे प्रवास करत असलेला कन्हैया कंपनीचा दुधाचा टेम्पो क्रमांक एम एच १६ सी डी ९८१९ हा कवठे येमाई जवळ आल्यावर या टेम्पोने टेम्पो क्रमांक एम एच ४२ बी ८८६६ या मालवाहतूक टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुधाच्या टेम्पोचा क्लिनर साईडकडील भाग पूर्णपणे उध्वस्त झाल्याने  त्या ठिकाणी बसलेल्या शांताबाई वाजे, ज्ञानेश्वर वाजे ,युवांश वाजे या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

अपघातातील तिघेही मृत मुंबईवरून वडनेर या त्यांच्या गावी येत होते. या अपघाता बाबत शिरूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून टाकळी हाजी औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार या अपघाताचा तपास करत आहेत.

.        


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement