• Total Visitor ( 481825 )
News photo

जळगावमध्ये ट्रँव्हल्स-ट्रकमध्ये भीषण अपघात;२ जण ठार 

Raju tapal June 04, 2025 74

जळगावमध्ये ट्रँव्हल्स-ट्रकमध्ये भीषण अपघात;२ जण ठार 



जळगाव :- जळगावमधील मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवारी सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.



अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला. धडक झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखवले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचा ताबा सुटणे अथवा चालकाला झोपेची डुलकी लागल्याने अपघात झाला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement