• Total Visitor ( 702009 )
News photo

आलेगाव पागा येथील विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा

Raju tapal October 18, 2025 98

आलेगाव पागा येथील विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा

           

शिक्रापूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणा-या  विद्यार्थीनीने प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे.

आलेगाव पागा येथील विमल तुळशीराम वाघचौरे भैरवनाथाचे दर्शन घेवून घरी जात असताना त्यांच्या गळ्यातील दागिना रस्त्यावर पडला. घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात आले.

सोनाली अहिरे ही विद्यार्थिनी विद्यालयात येत असताना भैरवनाथनगर -आलेगाव पागा रस्त्यावर तिला दीड तोळा सोन्याचे दागिने रस्त्यावर सापडले.तिने सापडलेले दागिने विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेनके यांच्याकडे सुपूर्द केले. सोनाली अहिरे या विद्यार्थिनीने तो दागिना मला रस्त्यावर सापडला आहे,तो दागिना शाळेत सरांकडे सुपूर्द केल्याचे सांगितले. विमल वाघचौरे यांचा मुलगा दत्तात्रय यांनी शाळेत जावून दागिने घेतले. सोनाली अहिरे या विद्यार्थिनीला शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राचार्य तुकाराम बेनके,एकनाथ शेलार,योगिराज मोरे,विलास वाघचौरे यांच्या उपस्थितीत रोख दोन हजार रूपये बक्षीस देवून सोनाली अहिरे या विद्यार्थिनीचा सत्कार केला.

          


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026