• Total Visitor ( 702055 )
News photo

चासोळे नदीवरील पुलाची दुरावस्था

Raju tapal October 14, 2025 127

 



चासोळे नदीवरील पुलाची दुरावस्था



राजेश भांगे - मुरबाड



सावित्री पुलाची पुनरावृत्ती होण्याची भिती.मुरबाड तालुक्यातील चासोळे नदीवरील पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलाच्या वरचा स्लॅब निघून गेल्याने सळई दिसत आहेत. याच रस्त्याने चासोळे,आंबिवली,खटल,न्याहाडी,मेर्दी व इतर २० गावांमध्ये जाता येते. परिणामी या पुलावरून जातांना जीव मुठीत धरून जावे लागते.

या पुलाला संरक्षण भिंत देखील नसल्याने या पुलावरून दोन वाहने जातांना खाली उतरून पहावे लागत असल्याने या पुलाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी चासोळे येथील नागरिक करत आहेत.चासोळे पुलाला अनेक वर्ष कठडे न बांधल्यामुळे या पुलावरून अनेक मोटारसायकल चे अपघात होऊन पुलात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026