• Total Visitor ( 429538 )
News photo

आशुक माशूक पारंपरिक रंगबाजीची खरी गंमत....

Raju tapal May 23, 2025 129

आशुक माशूक पारंपरिक रंगबाजीची खरी गंमत....



कल्याण :- दि. २७ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी कॅन्सर ग्रस्त रुग्णाच्या मदत निधीसाठी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मान्यवर, कलाकार, प्रेक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सादर होणार आहे.



महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोककला लावणी आहे. या लावणीचा आज देशविदेशात मोठा जाणकार प्रेक्षक वर्ग आहे. लोककलांचा उद्देशच मुळात लोकांना, समुहाला एकत्र आणणे हा आहे. लोककलांचा समाजप्रबोधनासाठी 

जनजागृतीसाठी प्रभावीपणे वापर केला जातो. अशाच सामाजिक भूमिकेतून कॅन्सर ग्रस्त रुग्णाच्या मदत निधीसाठी जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई यांच्या माध्यमातून सुरेखा कलामंच निर्मित आशुक माशूक या लाईव्ह लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष मा.रविंद्र घोडविंदे सर प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. याचे लेखन प्रा. हरेंद्र सोष्टे यांनी केले.कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन प्रा. महेश थोरात यांचे आहे. सहनृत्यदिग्दर्शन यामिनी रागा करीत आहे. पारंपरिकतेनुसार कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. पारंपरिक लावण्यांबरोबरच समकालीन लावण्यांचाही यात समावेश आहे. आघाडीचे नामवंत कलाकार यात आपली कला, नृत्य, अभिनय ,गायन, वादन, निवेदन, बतावणी सादर करणार आहेत. पारंपरिक लावणी आणि सोज्वळ अदाकारी अशी ओळख असणारी यामिनी रागा, चैन्नई सुपरफास्ट लावण्यवती अंबिका पुजारी, लावण्यतारका धनश्री हजारे,नाट्य अभिनेत्री लोककलेचा अभ्यास करणारी सुजाता किरण आणि नृत्यांगना सिने नाट्य अभिनेत्री धनश्री दळवी यांच्या दिलखेचक अदाकारी, सौंदर्याने नटलेल्या बहारदार लावणीं कार्यक्रमाचे आकर्षण आहे. सोबतच मराठी विषयाचे प्राध्यापक आणि लोककलेचे अभ्यासक प्रा.महेश थोरात यांच्या पारंपरिक लावणीचा नजराणा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

यासाठी अमोल - परेश यांचे अफलातून संगीत, लावणी महासंघाचे संस्थापक संतोष लिंबोरे यांचे भारदस्त निवेदन, गायिका नम्रता वेस्विकर यांच्या आवाजातील लावण्या याचा आस्वाद कार्यक्रमातून घेता येणार आहे. सोंगाड्याच्या भूमिकेत विनोद पाटील तर सहनृत्यागंना म्हणून जीवनदीप महाविद्यालयातील विद्यार्थ्यीनी जुईली पवार, राजनंदिनी लांजेवार, प्रतिज्ञा राऊळ, वैष्णवी मैस्त्री, काजळ धुमाळ यांचा सहभाग आहे. या माध्यमातून 

या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी आस्वाद घ्यावा आणि कॅन्सर ग्रस्त रुग्णाच्या मदत निधीसाठी आर्थिक मदत करावी यासाठी आव्हान करण्यात येत आहे. (तिकिटासाठी , मदतनिधी साठी संपर्क - 9004901135 ,9372267543)  या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर, कलाकार मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement