• Total Visitor ( 430180 )
News photo

कोरेगाव भीमा सरपंचाची‌ कार चोरणा-या चोरट्याला अटक

Raju tapal December 14, 2025 105

कोरेगाव भीमा सरपंचाची‌ कार चोरणा-या चोरट्याला अटक

           

शिरूर:- कोरेगाव भीमा येथील सरपंच संदीप ढेरंगे यांची फाॅर्च्युनर कार चोरून नेणा-या चोरट्यास पोलीसांनी अटक केली. अब्दुल हाफीज अब्दुल अजीज वय -४४ देऊळगाव राजा,बुलढाणा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा गावचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी त्यांची एम एच १२  टी एच १९७७ या क्रमांकाची फाॅर्च्युनर कार यशवंतराव डेअरी आॅफीस बाहेर उभी केली होती. पहाटे कार गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.पहाटे ४ वाजता चोरट्यांनी कारची चोरी केल्याचे त्यामध्ये स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार जनार्दन शेळके,संजू जाधव,शिक्रापूर पोलीस स्टेशनचे हवालदार श्रीमंत होनमाने‌,जयराज देवकर,अमोल नलगे यांनी बुलढाणा येथे जावून आरोपीला अटक केली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement