• Total Visitor ( 481820 )
News photo

पत्रा उचकटून शेतकऱ्यांच्या कंपनीवर चोरांचा डल्ला .. रोख रकमेसह,साहित्यांची चोरी.....

Raju tapal November 15, 2025 78

पत्रा उचकटून शेतकऱ्यांच्या कंपनीवर चोरांचा डल्ला .. रोख रकमेसह , साहित्यांची चोरी.....

           

शिक्रापूर (प्रतिनिधी):- तळेगाव ढमढेरे येथील कासारी फाटा रोडवर असणारे तळेगाव ढमढेरे शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरीचा यशस्वी प्रयत्न करून रोख रकमेसह इलेक्ट्रॉनिक मटेरियल कंपनीतील महत्त्वाचे दस्तऐवज घेऊन पोबारा केला आहे. मिळालेल्या माहितीनूसार,गुरुवारी रात्रीच्या एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पत्रे उचकटून कंपनीमध्ये प्रवेश केला तसेच कंपनी ऑफिसचे कुलूप तोडून ऑफिस मधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले ३३ हजार रुपये रोख,इलेक्ट्रिक मटेरियल कंपनीतील महत्त्वाचे दस्तऐवज चेक बुक घेऊन त्यांनी पलायन केले आहे. संपूर्ण चोरीचे सीसीटीव्ही फुटेज चित्रण झाले आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे गेट उघडण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चोरी झाल्याचा अंदाज आल्याने,पोलिसांना खबर देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तळेगाव ढमढेरे गावचे पोलीस पाटील पांडुरंग नरके,तसेच पोलीस बीट अंमलदार किशोर तेलंग यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिक्रापूर पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग करत आहेत. तळेगाव ढमढेरे शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली स्वीटकॉर्न मका खरेदी करणारी कंपनी असून त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कंपनीपासून मोठा फायदा होत असल्यामुळे अनेक शेतकरी या कंपनीसोबत जोडले गेलेले आहेत इतर बाजारात विक्री करण्यापेक्षा जास्त बाजारभाव शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी इकडेच मका माल देणे पसंत करत आहेत. झालेल्या घटनेमुळे येथील कामगार वर्ग व शेतकरी यांच्या कष्टाच्या पैशावरच चोरट्याने डल्ला मारल्याने मोठी आर्थिक हानी  झाली आहे. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कार्यवाही , कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी तळेगाव ढमढेरे कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आलेली आहे.       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement