• Total Visitor ( 515631 )

बढतीसाठी ठाण्यात ही एम.ए. करण्याची सुवर्णसंधी

Raju Tapal publisher May 16, 2026 6

बढतीसाठी ठाण्यात ही एम.ए. करण्याची सुवर्णसंधी



ठाणे :-पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईत जावे लागल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ठाण्यातच मराठी विषयातून एम.ए. करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये बढतीसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी प्रसारक मंडळाच्या के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभागाने एम ए अभ्यासक्रम सुरु केला आहे.यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.यामध्ये विविध क्षेत्रातील निवृत्त अधिकारी,शिक्षक, गृहिणी,ज्येष्ठ नागरिक,पोलीस,विविध महानगरपालिकेतील अधिकारी,क्लार्क,शिपाई,बँकेतील अधिकारी,निवृत्त अधिकारी,विविध कंपन्यातील अधिकारी,क्लार्क (लिपिक) विविध ग्रंथालयातील ग्रंथपाल,वृत्तपत्र संस्थेतील पत्रकार ज्यांचे कोणत्याही विषयात बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी.,एल.एल.बी.,एम.बी.ए.,झाले असेल त्यांना एम.ए. करता येईल रोजगाराभिमुख स्वरूप असलेल्या या अभ्यासक्रमामध्ये प्रसारमाध्यमे,भाषा व्यवहार,भाषांतर कौशल्ये,साहित्य अभ्यास,मुद्रितशोधन, अनुवादशास्त्र,ग्रंथव्यवहार तसेच पुस्तक प्रकाशन आणि वितरण यांचा समावेश करण्यात आला आहे.या अभ्यासक्रमामुळे कवी,लेखक, ब्लॉग लेखक,पटकथा लेखक,निवेदक,जाहिरात लेखक,मुद्रितशोधक,प्राध्यापक आणि संशोधक अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.आपली शैक्षणिक अहर्ता वाढविण्यासाठी इच्छुकांनी 30 मे 2026 पर्यंत प्रवेश घ्यावा.अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या ऑफिसमध्ये अथवा मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष लक्ष्मण राणे,9820176934 / 9819023904 किंवा ई-मेल santoshrane99999@ gmail. com वर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement