• Total Visitor ( 429351 )
News photo

शिरूर तालुक्यातील खंडाळे माथा येथे तीन मृतदेह जळालेल्या‌ स्थितीत

Raju tapal May 26, 2025 84

शिरूर तालुक्यातील खंडाळे माथा येथे तीन मृतदेह जळालेल्या‌ स्थितीत



शिक्रापूर :- शिरूर तालुक्यातील श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती जवळील खंडाळे माथा येथे तीन मृतदेह जळालेल्या‌ स्थितीत आढळून आले आहेत.

यात दोन लहान बालकांचा समावेश असून रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी या घटनेचा पंचनामा केल्याचे समजते.

या घटनेबाबत समजलेल्या माहितीनूसार,श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती पासून शिक्रापूरच्या दिशेने ३ कि.मी.अंतरावरील खंडाळे माथा येथे पुणे - अहिल्यानगर महामार्गानजिक रविवार दि.२५ मे २०२५ रोजी दुपारच्या सुमारास एक महिला,दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले. जळालेल्या तीनही मृतदेहांपैकी महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान असून एका लहान मुलाचे वय ४ वर्षांचे असून दुस-या लहान मुलाचे वय दीड वर्ष असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी घटनास्थळी येवून या घटनेचा पंचनामा करून तीनही मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत असे समजते.

          


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement