• Total Visitor ( 133774 )

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Raju tapal March 01, 2025 54

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी केला मोबाईल मध्ये व्हिडीओ शूट

राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हारळ गाव येथे प्रियकराच्या व त्याच्या बहिणीच्या जाचाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून आत्महत्ये पुर्वी तरुणीने मोबाईल मध्ये व्हिडीओ शूट करून आत्महत्या का करीत आहे हे सांगितले आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करून पोलीस अधिकचा तपास करत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळ्यात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणी सुमन मच्छिंद्र शेंडगे हिने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. प्रियकर सतत त्रास देत होता त्यामुळ सुमनने आत्महत्या केली. सुमन आणि सचिन शास्त्री यांचे गेल्या १० वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सचिन शास्त्रीने सुमनला 'तुझ्यासोबत लग्न करेन', असे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने ५ वर्षांपूर्वी गायत्रीसोबत लग्न केले. सुमनसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती सचिनची पत्नी गायत्रीला समजली आणि त्यानंतर सचिनच्या कुटुंबाकडून व सचिनकडून सुमनला त्रास देण्यास सुरूवात झाली. नेहमी सुमनला फोन करून सचिन आणि त्यांचे कुटुंब वारंवार त्रास देत होते. या त्रासामुळे सुमन मानसिकदृष्टया खचली होती. प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून सुमनने टोकाचे पाऊल उचलत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये तिने तिला सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांपासून नेमका काय त्रास होता आहे हे सांगितले. त्यानंतर तिने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले. या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी सचिन शास्त्री विरोधात मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement