• Total Visitor ( 449671 )
News photo

टिटवाळ्यात अजितदादांच्या आकस्मित निधनाबद्दल अभिवादन सभा संपन्न

Raju tapal February 01, 2026 209

टिटवाळ्यात अजितदादांच्या आकस्मित निधनाबद्दल अभिवादन सभा संपन्न



राजू टपाल.



टिटवाळा:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

यांचे बुधवारी 28 जानेवारी रोजी विमान कोसळून अपघाती निधन झाले. अजित दादांच्या या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. पण नियतीपुढे सर्व हतबल आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मांडा टिटवाळा परिसरातील सर्व पक्षीय यांच्या वतीने अभिवादन सभा शनिवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान कॉन्फ्रॅन्स हॉल,रिजन्सी सर्वंम क्लब हाऊस टिटवाळा येथे आयोजित केली होती. सदरील अभिवादन सभेसाठी ॲड.शेखर वाकोडे,मोरेश्वर(अण्णा)तरे,ॲड.विलास भारती,भूषण जाधव,ऍडव्होकेट राहुल रामटेके,गजानन खिसमतराव,संदीप नाईक,अकबर शेख,भास्कर मोरे,विजय पवार,शंकर तेलंग,किरण यादव,योगेश थेटे,प्रदीप पाटील,समाधान रोकडे,सरदार राठोड,दीपक माळी,जयवंत वारुडे,राजू कोरी इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते. 

सदर वेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या विषयी मनोगते व्यक्त केली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement