• Total Visitor ( 428893 )
News photo

डाॅ.बाबा आढाव यांना शिरूर येथे अभिवादन 

Raju tapal December 11, 2025 32

डाॅ.बाबा आढाव यांना शिरूर येथे अभिवादन 

       

शिरूर:- जेष्ठ कामगार नेते डाॅ.बाबा आढाव यांना शिरूर येथे अभिवादन करण्यात आले. शिरूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज दि.११ डिसेंबरला सकाळी ११ वाजता  शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती,हमाल पंचायत,रिक्षा पंचायत,आडते व्यापारी संघटना तसेच शेतकरी संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.या श्रद्धांजली सभेत कष्टक-यांचे नेते डाॅ.बाबा आढाव यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात येवून डाॅ.बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.विविध वक्त्यांनी या श्रद्धांजली सभेत श्रद्धांजलीपर भाषणे केली. बाजार समिती पदाधिकारी,जनता दलाचे पदाधिकारी,रिक्षा पंचायत पदाधिकारी, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी,शिरूर ग्रुप सोसायटीचे पदाधिकारी,शेतकरी संघटना,हमाल पंचायत पदाधिकारी ,भूमीपूत्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह शिरूर शहरातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,व्यापार क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी श्रद्धांजली सभेस उपस्थित होते.बाजार समितीचे माजी संचालक बंडू जाधव यांनी प्रास्ताविक केले.जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष ,शिरूर येथील यशवंतराव चव्हाण सामाजिक,शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.संजय बारवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले‌ यांनी आभार मानले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement