• Total Visitor ( 472836 )
News photo

मांडा ग्रामीणचे सहाय्यक विद्युत अभियंता तुकाराम घोडविंदे यांचा सन्मान

Raju Tapal publisher April 09, 2026 15

मांडा ग्रामीणचे सहाय्यक विद्युत अभियंता तुकाराम घोडविंदे यांचा सन्मान



राजू टपाल.

टिटवाळा :- महावितरणच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कल्याण ग्रामीण विभागाचे मांडा ग्रामीण शाखेचे उपविभाग उंभारणी चे सहायक अभियंता तुकाराम गोपाळ घोडविंदे यांचा कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांनी प्रशस्तीपत्र व सन्मान चिह्न देऊन सन्मान केला. सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे यांनी कल्याण ग्रामीण विभागाअंतर्गत आर्थिक वर्ष 2025/2026 मध्ये मुख्य कार्यालयाने दिलेल्या वीज देयक वसुलीचे उदिष्ट तसेच अखंडीत दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी घेतलेल्या अथक प्रयत्नान बद्दल उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार सन 2025/2026 सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. 

कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांनी भविष्या मध्ये असाच उत्साह, स्पुर्ती व कठोर परिश्रम करून महावितरणचा प्रगतीसाठी योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करत अभिनंदन व शुभेछा व्यक्त केल्या. मांडा ग्रामीण शाखेअंतर्गत मांडा ग्रामीण विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वीजबिल वसुलीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सदर कालावधीत सेक्शनचा एकूण डिमांड 7.74 कोटी रुपये असताना प्रत्यक्ष वसुली 8.60 कोटी रुपये करण्यात आली असून,111.07% इतकी उत्कृष्ट वसुली नोंदविण्यात आली आहे. यामुळे शाखेने निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक कामगिरी करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

विशेष म्हणजे,प्रभावी नियोजन,सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ग्राहकांशी योग्य संवाद यामुळे मांडा ग्रामीण शाखेला थकबाकी कमी करण्यातही मोठे यश मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 10 लाख रुपयांनी थकबाकी कमी करण्यात आली असून, ही बाब शाखेच्या जबाबदार आणि नियोजनबद्ध कामकाजाचे द्योतक आहे. या यशामध्ये शाखा अभियंता तुकाराम गोपाळ घोडविंदे,सहाय्यक अभियंता व सर्व कर्मचारी यांच्या समन्वयित प्रयत्नांचा मोठा वाटा असून,त्यांच्या मेहनतीमुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली आहे. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाने हे यश प्राप्त झालं आहे. भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवण्याचा निर्धार मांडा ग्रामीण शाखेने व्यक्त केला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement