• Total Visitor ( 700801 )
News photo

मौजमजा करण्यासाठी मोटरसायकली चोरून नेणा-या दोघांना अटक

Raju Tapal publisher August 02, 2026 84

मौजमजा करण्यासाठी मोटरसायकली चोरून नेणा-या दोघांना अटक

      

शिरूर (प्रतिनिधी):- मौजमजा करण्यासाठी मोटरसायकली चोरून नेणा-या दोघांना अटक करून १७ मोटरसायकली जप्त करण्याची कामगिरी खेड पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे. रोहित आप्पासाहेब कानगुडे‌ वय -२२ रा‌.नांदगाव ता‌.कर्जत जि‌.अहिल्यानगर,चंद्रशेखर अनिल पवार वय २२ रा‌.नांदगाव ता‌.कर्जत जि‌.अहिल्यानगर अशी अटक केलेल्या आरोपी़ची नावे असून आरोपी़कडून १४ गुन्हे उघडकीस आले असून खेड,शिक्रापूर ता‌.शिरूर  पारगाव,मंचर,म्हाळूंगेउत्तर,वडूज ता‌.जुन्नर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा समावेश आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित कुदळे,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे‌,महेश गरड‌,पोलीस हवालदार बापूसाहेब बीडकर,महेश गोसावी,सुरज राक्षे,गोकूळ कोळी,संकेत कवडे‌ या पोलीस पथकाने ही कामगिरी केली.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026