• Total Visitor ( 425817 )
News photo

वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू 

Raju tapal March 10, 2026 20

वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

        

शिक्रापूर:- दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील कासारी फाटा व शिक्रापूर येथे घडली. महेश धोंडीराम भगत वय -४४ रा‌.सध्या शिक्रापूर मूळ रा‌.काले ता‌.जुन्नर जि.पुणे, सचिन वसंत आडे वय -३० रा‌.रांजणगाव गणपती ता‌.शिरूर मूळ रा‌.ईश्वरनगर तांडा ता‌.उमरी जि‌.नांदेड अशी अपघातातील मृतांची नावे असून पवन रामचंद्र चव्हाण वय -३० रा‌.रांजणगाव गणपती मूळ रा‌.पळसगाव तांडा ता‌.उमरी जि‌.नांदेड,प्रवीण शंकर धुमाळ वय -३९ रा‌.पिंपळे धुमाळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलीसांनी अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. महेश भगत हे त्यांच्या दुचाकीवरून दि‌.९ मार्चला पहाटे अहिल्या नगर बाजूने पुण्याच्या दिशेने जात असताना कासारी फाट्याजवळील हाॅटेलसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महेश भगत अपघातात गंभीर जखमी झाले.

सचिन आडे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना कोंढापुरी येथे पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने सचिन आडे अपघातात गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलीस हवालदार किशोर तेलंग,अतुल पठारे या अपघाताचा पुढील तपास करत आहेत असे समजले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement