• Total Visitor ( 430656 )
News photo

शिंदवणे‌ अपघातातील तळेगाव ढमढेरे येथील दोघा जखमी युवकांचे निधन 

Raju tapal December 16, 2025 163

शिंदवणे‌ अपघातातील तळेगाव ढमढेरे येथील दोघा जखमी युवकांचे निधन 

          

ट्रक - दुचाकीचा अपघात 

          

शिरूर:-  समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत जेजुरी उरूळी कांचन रस्त्यावर घडली होती. या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या दोघा युवकांचे आज मंगळवार दि.१६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी निधन झाले. सार्थक विजय ढमढेरे वय- २० वर्षे ,समीर संभाजी ढमढेरे वय -२० वर्षे अशी अपघातातील दोघा निधन झालेल्या युवकांची नावे आहेत. सार्थक ढमढेरे,समीर  ढमढेरे हे त्यांच्या आणखी एका मित्रासमवेत पुरंदर तालुक्यातील श्री.क्षेत्र नारायणपूर येथे देवदर्शन करण्यासाठी दुचाकीवर गेले होते.देवदर्शन करून संध्याकाळी उशिरा नारायणपूरहून घरी तळेगाव ढमढेरेकडे परतत असताना शिंदवणे घाटात पुढे वाकवस्ती परिसरात आले असताना उरूळी कांचननहून जेजुरीकडे भरधाव वेगातील ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरूणाने उडी मारली.ट्रकचालकाने दुचाकी १०० ते १२५ फूट फरफटत नेले होते. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकांना पुण्यातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उरूळी कांचन पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार उद्धव गायकवाड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. अपघाताच्या वृत्त  टिटवाळा न्यूजने शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केले होते. अपघातातील दोघा युवकांचे आज मंगळवार दि.१६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी निधन झाल्याच्या वृत्तास तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थ,जिजामाता मोबाईल शाॅपीचे प्रोप्रायटर कल्याण नंदू ढमढेरे यांनी दुजोरा दिला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement