ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू ; काळेवाडी येथील घटना
शिक्रापूर:- संक्रातीनिमित्त साड्या खरेदीसाठी स्कुटी वरून जात असलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या स्कुटीला ट्रकने धडक दिल्याने दोन्ही सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना काळेवाडीमध्ये बुधवार दि.१४ जानेवारीला दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. ऋतुजा पांडुरंग शिंदे वय -२४ ,नेहा पा़डूरंग शिंदे वय -२० दोघीही रा.पुनावळे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत.
पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेत संक्रांती निमित्त साड्या खरेदीसाठी स्कुटी वरून जात असताना रहाटणी फाटा येथे त्या़ंच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोघींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यांना रूग्णालयात दाखल करताच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ट्रकचालक नागपूर येथून वाटाणा घेवून पुणे येथे आला होता.तो पोती उतरवून परतत असताना ही घटना घडली. जितेंद्र निराले रा.खलघाट जि.धार मध्यप्रदेश या ट्रकचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले. ऋतुजा शिंदे हिने ताथवडे येथे कायद्याचे शिक्षण घेतले होते. ती वकील होती. नेहा शिंदे काॅलेजची विद्यार्थिनी होती.दोघीही आई वडिला़चा आधार होत्या. दोघीही संक्रांती निमित्त खरेदीसाठी पुनावळे येथून घराबाहेर पडल्या होत्या असे समजते.