• Total Visitor ( 429670 )
News photo

दुचाकी खड्ड्यात जावून अवसरीतील दोन तरूणांचा मृत्यू 

Raju tapal October 14, 2025 136

दुचाकी खड्ड्यात जावून अवसरीतील दोन तरूणांचा मृत्यू 

            

शिक्रापूर (प्रतिनिधी):- दुचाकी खोल खड्ड्यात जावून अवसरी बुद्रुक ता‌.आंबेगाव येथील दोघा तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.१३ आॅक्टोबरला घडली.

आकाश बाळासाहेब जाधव वय -२८ ,मयूर संपतराव जाधव वय -२३ अशी मृतांची नावे आहेत.

मंगळवार दि.१४ आॅक्टोबरला आकाशच्या वाढदिवस होता.मित्रांसमवेत केक कापण्याचे ठरवून आकाश व मयूर मंचर येथे गेले.रात्री उशिरा केक घेवून ते त्यांच्या अवसरी बुद्रुक गावाकडे दुचाकी क्रमांक एम एच १४ एम एन ७१६४ वरून परतत असताना अवसरी खुर्द हद्दीत सुरेश भोर यांच्या घराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात दुचाकी कोसळली.

मोठा आवाज ऐकून सुरेश भोर, संदीप भोर, सरपंच वैभव वायाळ, अमोल वायाळ ,योगेश भोर, अमित भोर यांनी दोर टाकून दोघांनाही बाहेर काढले.मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डाॅक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

सहाय्यक फौजदार गणेश डावखर‌, पोलीस काॅन्स्टेबल लखन माने, ढोबळे यांनी पंचनामा केला.

राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,पुणे जिल्हा दूध संघाचे विष्णू हिंगे यांनी रूग्णालयात जावून नातेवाईकांचे सांत्वन केले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement