• Total Visitor ( 435489 )
News photo

श्रामणेर संघाच्या स्वागत समारंभास अभुतपुर्व प्रतिसाद

Raju tapal June 09, 2025 57

श्रामणेर संघाच्या स्वागत समारंभास अभुतपुर्व प्रतिसाद



राजू टपाल.

टिटवाळा :- “ज्ञानपीठ बुद्ध विहार” अटाळी-आंबिवली शाखा आयोजित युवक श्रामणेर शिबीरातील श्रामणेर शिबीरार्थींच्या स्वागत समारंभ तसेच भोजनदान कार्यक्रम टिटवाळा विभागातील भारतीय बौद्ध महासभेच्या नालंदा शाखा आणि मधुबन हाउसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमास ठाणे जिल्हा तसेच कल्याण तालुका शाखेचे सन्माननीय पदाधिकारी,तक्षशिला शाखेचे पदाधिकारी,सम्यक संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी,अनेक उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वाजपेयी चौक ते मधुबन हौसिंग सोसायटी पर्यंत संघाची मिरवणूक काढण्यात आली.

श्रामणेर संघास भोजन दान केल्यानंतर पुढील नियोजीत कार्यक्रमास सुरुवात झाली. नालंदा शाखेचे सरचिटणीस आदरणीय बौद्धाचार्य प्रफुल वत्सला जगन शार्दुल यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. शाखेचे कार्यालयीन सचिव प्रविण वत्सला जगन शार्दुल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली आणि संघांसाठी स्वलीखीत स्वागत गीत गायले.

तत्पूर्वी शाखेचे कोषाध्यक्ष बौद्धाचार्य प्रकाश गायकवाड गुरुजी यांनी संघास पंचशील देण्याची याचना केली.

कल्याण तालुका शाखेचे संस्कार विभाग प्रमुख मिलींद आहिरे गुरुजी यांनी शिबीराची माहिती दिली. धम्माचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे असे त्यांनी सांगितले.

संघनायक भंते सुबोध यांनी उपस्थीतांना धम्मदेसना दिली आणि उपसकांनी विहारात नियमित उपस्थित राहण्यासाठीचे आवाहन केले.

नालंदा शाखेने उपस्थीतांना शितपेय तसेच खीर दान केले. समता सैनिक दलाने तसेच टिटवाळा पोलिस प्रशासनाने संघाच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडली.

नालंदा शाखा आयोजित ह्या स्वागत समारंभ कार्यक्रमास अभुतपुर्व असा प्रतिसाद मिळाला.अशी माहिती संस्कार विभाग 



भारतीय बौद्ध महासभा 

नालंदा शाखा टिटवाळा यांनी दिली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement