उरूळी कांचन डाॅक्टर वेलफेअर असोसिएशनचा निर्णय स्वागतार्ह,स्तुत्य; पत्रकार विजय ढमढेरे यांची प्रतिक्रिया
शिक्रापूर ( प्रतिनिधी):- हवेली तालुक्यातील पत्रकारांसाठी ५० टक्के सवलतीत वैद्यकीय उपचार करण्याचा उरूळी कांचन डाॅक्टर वेलफेअर असोसिएशनने घेतलेला निर्णय स्वागतार्ह,स्तुत्य असल्र्याची प्रतिक्रिया पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य,राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक, पत्रकार विजय ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे.
पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने उरूळीकांचन डाॅक्टर वेलफेअर असोसिएशनने मोठे पाऊल उचलले आहे.
या दिलासादायक निर्णयानुसार पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांना,आई,वडील,पत्नी,मुले यांना वैद्यकीय उपचारांमध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. हा लाभ पूर्व हवेलीतील अनेक गावांतून १५० हून अधिक रूग्णालयांमध्ये मिळणार असून ही योजना लवकरच अंमलात येणार आहे. ही बातमी दैनिक प्रभात ने पुणे आवृत्तीत प्रसिद्ध केली आहे.
सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून डाॅक्टर वेलफेअर असोसिएशनने हा निर्णय घेतला असून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिनमहाराज माथेफोड यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.
रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात डाॅक्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.गणेश आखाडे, उपाध्यक्ष डाॅ.प्रशांत शितोळे,डाॅ.उमा कथले ,डाॅ.शरद गोते, डाॅ.परिमल परदेशी, डाॅ.समीर ननावरे, डाॅ.विजय फडतरे, डाॅ.सुनील गांगुर्डे यांच्या हस्ते सवलतीचे पत्र उपस्थित पत्रकार राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन सुंबे,राज्य उपाध्यक्ष नितीन करडे, भाऊसाहेब महाडीक,सहदेव खंडागळे, सुनील तुपे, चंद्रकांत दुंडे यांना देण्यात आले.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य,राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक, कोंढापुरी येथील पत्रकार विजय संभाजीराव ढमढेरे यांनी म्हटले आहे,पुणे जिल्ह्यातील अनेक पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.किरकोळ आजारांसाठीही खाजगी दवाखान्यातील उपचार अनेक पत्रकारांना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने परवडत नाही.आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने पूर्व हवेलीतील पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांसाठी उरूळी कांचन डाॅक्टर वेलफेअर असोसिएशनने घेतलेला निर्णय दिलासादायक असून पत्रकारांच्या सेवेला दिलेल्या मान्यतेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे.या निर्णयामुळे अनेक पत्रकार कुटूंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
यासाठी प्रयत्न केल्याबद्दल राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिनमहाराज माथेफोड यांचे आभार मानून पत्रकार विजय ढमढेरे यांनी म्हटले आहे,उरूळीकांचन डाॅक्टर वेलफेअर असोसिएशनने घेतलेला निर्णय पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील वैद्यकीय संघटनांना मार्गदर्शक असून उरूळी कांचन डाॅक्टर वेलफेअर असोसिएशनने पत्रकारांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत पुणे जिल्ह्यातील इतर वैद्यकीय संघटनांनीही प्रयत्न करावेत अशी मागणी पत्रकार ढमढेरे यांनी यानिमित्ताने केली आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)