व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या वतीने अल्पदरात रोपे विक्री
शिक्रापूर:-शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या वतीने दि.२९ मे २०२५ पासून दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील आंबा,नारळ,चिक्कू,लिंबू,जांभूळ रोपे अल्प दराने विक्री केली जात आहे.शेतक-यांनी शेतकी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी केले आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर)