व्यंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर
शिरूर (प्रतिनिधी विजय ढमढेरे):- शिरूर तालुक्यातील लक्ष्मीनगर,जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याने लागवड हंगाम २०२६-२७,गळीत हंगाम २०२७-२८ ऊस लागवड धोरण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केले आहे. आडसाली दि.१ जून २०२६ ते ३१ आॅगस्ट २०२६ को एम ०२६५, को ८६०३२ फुले ऊस १३००७, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६ पूर्व हंगामी दि.१ सप्टेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६,को एम ०२६५,को ८६०३२, को व्ही एस आय १८१२१,फुले ऊस १५००६,फुले ऊस १५०१२ सुरू १ डिसेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ को एम ०२६५, को ८६०३२,को व्ही एस आय १८१२१, फुले ऊस १३००७ ,फुले ऊस १५००६,फुले ऊस १५०१२ ,एम एस १०००१
खोडवा :- गळीत हंगाम अखेर तुटलेल्या उसाचा खोडवा राखावा असे आवाहन कारखान्याने परिपत्रकाद्वारे केले आहे.
ऊस लागवड करताना ऊसाची रोपे ५ × दीड फूट अंतरावर लागवड करावी, त्यामुळे लागवडी पर्यंतच्या खर्चाची बचत होते.ऊस बेणे ,तोडणी वाहतूक,पाणी,तणनाशक इ.खर्चात बचत होते. शेतक-यांच्या मागणीनुसार कारखान्यामार्फत मान्यताप्राप्त नर्सरीमधून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण ऊस रोपे योग्य दरात रोखीने पुरविण्यात येतील. ऊस लागवड करताना ऊसाचे बेणे ,बेणे मळ्यातील ९ ते १० महिने वयाचे वापरावे,दोन डोळ्यांची टिपरी वापरून दोन टिप-यांंतील अंतर ९ इंच ठेवून लागवड करावी,ऊस उत्पादकांनी माती परिक्षण करुन घेवून शिफारसीनुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी . यांत्रिक पद्धतीने ऊस तोड करणे करिता ऊस लागवड ५ फुट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवून करावी. ऊस रोपांची लागवड प्रत्यक्ष शेतात केल्यानंतर सदर लागवडीस अगोदरची ३० दिवसांची तारीख देण्यात येईल असे कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.