• Total Visitor ( 701857 )
News photo

रांजणगाव एम आय डी सी पोलीसांकडून ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित 

Raju tapal July 08, 2025 110

रांजणगाव एम आय डी सी पोलीसांकडून ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित 



शिक्रापूर :- वाढत्या चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या वतीने ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जुलै रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

परिसरातील पोलीस पाटील, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सुरक्षा दलातील तरूण यांच्यासह भांबर्डे,बाभुळसर खुर्द,करंजावणे, खंडाळे, गणेगाव खालसा,वाघाळे, पिंपरी दुमाला, कर्डेलवाडी आदी गावांतील प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.

गावांमध्ये सी सी टी व्ही बसविणे, पोलीस, ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने रात्र गस्त करणे, गावांतील मुख्य चौक, धार्मिक स्थळे, वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

करंजावणे गावातील २५ तरूणांना टि शर्ट,लाठी,शिट्टीचे वाटप पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

ग्राम सुरक्षा दलात सहभागी होण्यासाठी तरूणांनी पुढे यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी यावेळी केले.

.           


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026