शिरूर नगरपरिषद निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर नगरपरिषद निवडणुकीचे १२ प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी पुनम अहिरे यांच्या उपस्थितीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील, नगरपरिषद अधिक्षक राहूल पिसाळ, पंकज काकड, चंद्रकांत पठारे, विनोद उबाळे यावेळी उपस्थित होते. आरक्षण सोडत उद्योगपती रसिकलाल धारिवाल सभागृहात काढण्यात आली. आरक्षण ९ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार असून ९ ते १४ आॅक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्याकडे सादर कराव्यात. ज्यांना हरकती किंवा सुचना करावयाच्या असतील त्यांना स्वतंत्रपणे सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे:-
प्रभाग क्रमांक १ अ :- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक १ ब :- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २ अ :- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
प्रभाग क्रमांक २ ब:- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३ अ :- नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्रमांक ३ ब :- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ४ अ :- अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्रमांक ४ ब :- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५ अ :-सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ५ ब :- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६ अ :- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक ६ ब :- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७ अ :- नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्रमांक ७ ब :- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ८ अ :- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्रमांक ८ ब :- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९ अ :- अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक ९ ब :- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक १० अ :- अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्रमांक १० ब :- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११ अ :- अनुसूचित जमाती महिला
प्रभाग क्रमांक ११ ब :- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १२ अ :- नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्रमांक १२ ब :- सर्वसाधारण महिला