• Total Visitor ( 514191 )
News photo

युवकांचा अवमान सहन करणार नाही,संजय राऊत माफी मागा

Raju Tapal publisher May 15, 2026 8



युवकांचा अवमान सहन करणार नाही,संजय राऊत माफी मागा



युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा



देशातील युवक सुसंस्कृत,राऊतच मंद झालेत

 

ठाणे :- देशातील युवकांचा अवमान करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी,अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेनेकडून शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल,असा इशारा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी आज दिला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरनाईक म्हणाले की,राऊत यांना चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारे वाईट बोलण्याची सवय आहे. राऊतच मंद झाले असून भरकटले आहेत,अशी टीका सरनाईक यांनी केली. राऊत यांनी तरुणांबद्दल केलेल्या एक्स पोस्टची सरनाईक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते पुढे म्हणाले की राऊतांनी त्यांच्याच पक्षातील युवा नेत्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील युवकांवर खापर फोडले असावे,असा टोला सरनाईक यांनी यावेळी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील युवा पुढे जात आहे. देश विकास पथावर आहे,मात्र विकासावर टीका करणे हा राऊत यांना रोग लागला आहे. राऊत यांनी युवकांचा केलेला अवमान खपवून घेणार नाही. त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफी मागितलीच पाहिजे,अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेना शिवसेना स्टाईल आंदोलन करेल,असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुण पुढे जात आहेत आणि येणाऱ्या काळात राज्यासाठी चांगले काम करतील,असा विश्वास सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. देशात युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. राऊतांकडून युवकांना भरकटवण्याचे काम होत आहे मात्र त्याला इथला युवक बळी पडणार नाही,असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. देशातील आणि महाराष्ट्रातील युवा सुसंस्कृत असून नेपाळसारखे भारतात युवकांकडून आंदोलन होणार नाही,असे सरनाईक म्हणाले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement