• Total Visitor ( 428036 )
News photo

टिटवाळ्यात १ किलोहून अधिक गांजासह युवक अटकेत

Raju tapal May 24, 2025 331

टिटवाळ्यात १ किलोहून अधिक गांजासह युवक अटकेत



दिशान दोस्तमोहम्मद खलिफा या आरोपीला अटक



टिटवाळा :- कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्रीच्या वाढत्या घटनांवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी यावर मोठी कारवाई करीत गांजाच्या साठ्याचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक  मांडा पश्चिमेतील एका ठिकाणी धाड टाकून दिशान दोस्तमोहम्मद खलिफा (वय २८ वर्ष) या इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून झडती घेतली असता त्याच्याकडून १ किलो १३१ ग्रॅम इतक्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ सापडला.

पोलिसांनी सदर गांजा कायदेशीर प्रक्रियेने जप्त केला असून, आरोपी विरोधात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास २६ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपीच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. गांजाचा इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडल्याने, या प्रकरणाचा संबंध अधिक मोठ्या रॅकेटशी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  यानंतर अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement