• Total Visitor ( 435807 )
News photo

जिल्हा परिषद अमरावतीचे मिशन १०० स्काॅलरशीप

Raju tapal August 12, 2025 66

जिल्हा परिषद अमरावतीचे मिशन १०० स्काॅलरशीप



अमरावती जिल्हयातील जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम..



१२ आॅगस्टला शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणीचे आयोजन



अमरावती :- अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापाञ यांच्या संकल्पनेतुन मिशन १०० स्काॅलरशिप हे जिल्हा परीषद शाळेतील वर्ग ५वी व ८वी च्या विद्यार्थाची स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणुन शिक्षण विभागाच्या सहकार्याने १२ आॅगस्टला जिल्हातील ५वीच्या ९२६८व८वीच्या ३७६६अश्या १३०३४ विद्यार्थांची शिष्यवृती परीक्षा सराव चाचणी घेण्यात येणार आहे. जिल्हातील १४ही तालुक्यातील मराठी,उर्दू व सेमी इग्रजी माध्यमाच्या विद्यार्थांना १००%सराव चाचणी दयावी लागणार आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्हा परीषद कडून प्रश्न पञिका व उत्तर पञिका सर्व शाळेला पुरविण्यात आल्या आहे. विद्यार्थांचा सराव होऊन शिष्यवृत्ती परीक्षेत १००% यश प्राप्त करावे हा या सराव परीक्षेचा उद्देश आहे अशी माहीती मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापाञ यांनी दिली आहे.

जिल्हातील जिल्हा परीषद मधिल विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावा या करीता जिल्हातील तंज्ञ शिक्षकांच्या मदतीने हे सराव पेपर तयार करण्यात आले आहे.१२ आॅगस्टला सर्व पर्यवेक्षिय यंञने मार्फत ही सराव परीक्षा होणार आहे. गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या नियंञणात ही सराव परीक्षा होणार आहे. या करीता पेपर १व२ या मध्ये भाषा व गणित आणि दुसरा पेपर इंग्रजी,बुध्दीमंता चाचणी हे विषय राहणार आहे. ही सराव चाचणी झाल्या नंतर या विद्यार्थांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे सराव वर्ग घेतले जाणार आहे अशी माहीती शिक्षण विभागाच्या अधिकारी यांनी दिली आहे.

======================

उपक्रमाचे उदिष्टे



जि.प.शाळांमधील इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढ करणे.

विशेषतः आदीवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेकरीता पूर्वतयारी करणे.

परीक्षेचा सराव करुन विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करणे.

शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळांमधील मुलांचा सहभाग वाढविणे.

शिष्यवृत्ती परीक्षेकरीता आवश्यक संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करुन देणे.

आत्मविश्वास वाढवून परीक्षार्थीना सक्षम बनविणे.

---------------

शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती

कृती कार्यक्रम



पूर्वतयारी आणि नियोजन



BEO, केंद्र प्रमुख यांच्या कार्यशाळा घेवून पूर्वतयारी आणि नियोजन करण्यात आले.



सहभाग जास्तीत जास्त इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी मधिल विद्यार्थ्यांची परीक्षेची पूर्व तयारी करुन सहभाग नोंदविण्यात आला.



तज्ञ शिक्षक मार्गदर्शन परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक तालुक्यातील ५ तज्ञ शिक्षकांची निवड करणे

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement